Featured post

इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर , Excel software for 9th result.

🌀 इ 9 वी चा रिझल्ट बनवण्याचे Excel सॉफ्टवेअर 2017-18 ! 🌀 9th Result Software 【 🚫 सूचना: क्लिक केल्यावर काही वेगळेच ओपन झाल्यास ती...

विज्ञानाचे प्रयोग

विज्ञानाचे सोपे प्रयोग


�� विज्ञानातील सोपे प्रयोग ��
��भाग ��
������������������
�� खार्या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्यखारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.कृतीएक परात घ्या. परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणी किंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्या सहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊन थांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपात सांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीच वाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.
��सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्यसूर्यफूल, खडू.कृतीएक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा. एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूने जोडा. दुसर्या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीने सर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूण नसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाच दिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५ कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्ध दिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.
��रम्य गुणोत्तर
साहित्यएक हात, पट्टी.कृतीआपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतची लांबी मोजा. नोंदवून ठेवा. (). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (). मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (). आणि यांचे गुणोत्तर काढा. तसेच आणि यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे .६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एका सरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंड यांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.
��बसल्या बसल्या वीज.
साहित्यप्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.कृतीएका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेलानायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकीकापडाचा मोठा तुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडा व्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्ट दिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्या हालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्ही विरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.
��अंगात वीज.
साहित्यतुम्ही स्वत:कृतीतुमचा एक हात - डावखोर्यांनी उजवा आणि उजखोर्यांनी डावासरळ जमिनी समांतर ताणा. तो हात कोपर्यात दुमडा. दुसर्या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्याच्या हाडाच्या टोकावर हलका झटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्म प्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो. त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.
��सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्यआरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.कृतीएका 4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील. आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
��संत्र्याची आतषबाजी
साहित्यमेणबत्ती, काड्यापेटी, संत्रीकृतीसंत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्ती काड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोट यांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेड पाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्या ज्योतिमुळे पेटतात संपून विझतात.
��मऊ काजू करा टणक
साहित्यमऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिजकृतीमऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबिया खायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशी फ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आत शिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातला दमटपणा बाहेर फेकला जातो.
��आम्लतादर्शक पट्टी
साहित्यसाधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.कृतीसाधागुळगुळीत नसलेलावहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्या पाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंत वाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्या तुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपली आम्लतादर्शक पट्टी तयार झाली. झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्या अर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.
��हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्यमीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.कृतीछोट्या खलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा. आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्या द्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेला दिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो खलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईड वायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.
❄❄❄❄❄❄❄❄❄

माहिती आवडल्यास अभिप्राय लिहायला विसरू नका

10 comments:

  1. सुंदर रचना आहे

    ReplyDelete
  2. असेच आणखी सहज करता येण्यासारखे प्रयोग असतील तर करायला आवडतील. खूपच छान.��

    ReplyDelete
  3. असेच आणखी सहज करता येण्यासारखे प्रयोग असतील तर करायला आवडतील. खूपच छान.��

    ReplyDelete

Powered by Blogger.