🎁 रक्षाबंधन स्पेशल मिठाई *"कलाकंद"* घरीच बनवा फक्त 3 वस्तू पासून !

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]

नागपंचमीचे महत्व आणि माहिती (Nagapanchamiche mahatv aani mahiti)

--------------------------------------------------------------
मराठी सण / मराठी फेस्टिवल / फेस्टिवल्स (Marathi San / Marathi Festival / Marathi Festivals)
--------------------------------------------------------------------------------------------

श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.

भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

पुराणकाळातील “कालीया मर्दनाची कथा” ते अगदी परवा-परवा पर्यंत रौद्र रुपात भेटीस येणारा “ऍनाकोंडा” अश्या अनेक रुपातुन सर्पाची आपल्याला ओळख आहे.

परंतु श्रावण सुरु होतो आणि श्रावण महीन्यातील शुद्ध पंचमीला येणारा, पहीला महत्वाचा सण म्हणजे “नागपंचमी” च्या दिवशी हाच नागराज घरोघरी देवतेच्या रुपात विराजमान होतो. ह्या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात.

आज नागपंचमी, त्यानिमीत्त जाणुन घेऊ यात ह्या सणाबद्दल -

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.

श्रावणातील बहुतेक सणांना इतिहास आहे आणि तो इतिहास कथांच्या स्वरुपातुन पिढ्यांपिढ्या पुढे पोहोचवला जातो. नागपंचमीच्या बाबतीत सुध्दा अशीच एक कथा प्रचलीत आहेत ति आपण पाहु.

    एका राज्यात एक गरीब शेतकरी कुटुंब होते. त्या शेतकर्‍याला दोन मुले व एक मुलगी होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकर्‍याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावतात. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकर्‍याविषयी सूडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकर्‍याचा सूड घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकर्‍यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली.

    दुसर्‍या दिवशी नागीण पुन्हा शेतकर्‍याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागीणीला पाहताच शेतकर्‍याच्या मुलीने नागिणीसमोर दुधाने भरलेली वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकर्‍याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. त्यानंतर नागिणीने तिचे आई-वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणार्‍या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.

नागपंचमीच्या दिवशी केल्या जाणार्‍या विविध कृती व त्या करण्यामागची कारणे

    * उपवासाचे महत्त्व

      पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. `भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्‍ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख व संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो व त्याचे रक्षण होते.
    * नागाची पूजा करण्यामागील शास्त्र

      सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
    * नवीन वस्त्रे व अलंकार घालण्याचे कारण

      सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी व तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वर समाधानी झाला. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्रे व अलंकार परिधान करतात.
    * मेहंदी लावण्याचे महत्त्व

      सत्येश्‍वर नागराजाच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. `तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वत:च्या हातांवर मेहंदी काढते.
    * झोका खेळण्याचे महत्त्व

      दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती जंगलात सैरावैरा भटकू लागली व शोधता शोधता नागपंचमी गाणे
झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असतो – `जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दु:खे खाली जाऊ देत.’

`नागपंचमी’ श्रावण शुद्ध पंचमीलाच का येते ?

पुराणांमध्ये एक कथा आहे. तक्षक नागाने केलेल्या अपराधाबद्दल सजा म्हणून राजा जनमेजयान सर्पयज्ञ सुरू केला. या सर्पयज्ञात त्याने सर्व सर्पांच्या आहुती देणे सुरू केले. तक्षक नाग मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. राजा जनमेजयान मग `इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा: ।’ असे म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली. आपल्या या कृतीतून राजा जनमेजयान अपराध्याइतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी हे दाखवून दिले. आस्तिकऋषींनी राजा जनमेजयाला तप करून प्रसन्न करून घेतले. जनमेजयान आस्तिकऋषींना `वर मागा’ असे म्हटले आणि मग आस्तिकऋषींनी सर्पयज्ञ थांबवावा, असा वर मागितला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण येतो. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी हा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्‍तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

  श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

कालानुरुप समाजाने अनेक विधी, घटना कालबाह्य, थोतांड ठरवल्या. नागपंचमीच्या दिवशी सर्पाला मिळणारे अवास्तव महत्व जाणुन गारुडी लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. सर्प दुध पितच नाही, किंबहुन पित असला तरी दारोदारी येणारी सापांची तोंड शिवलेली असतात त्यामुळे नैवेद्य म्हणुन दिलेले दुध हे त्यांना मिळतच नाही आणि काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. ह्यासाठीच सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्‍या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची गारूड्यांच्या तावडीतुन सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.

अर्थात खरे सर्प उपलब्ध नसले तरी बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केली जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो.


--------------------------------------------------------------------------------------------

नागपंचमी गाणे


सूर्व्याची कन्या राधिका बत्तीस लक्षणी देवंता
उठली कोंब्या फटफटीं पेटविल्या चंदनवाती
केला केर नी वारा गेली बागाईच्या गोठ्यां
आणलं गुळीभर शेंण केलं सडा सारवण
घातली कणा रांगूयीळी घेतली तांब्या घागयीर
घेतली मोत्या चुंबयीळ घेतली गजनी चोळी
घेतला पिवळा पितांबर राधिका नेसून निघायीली
गेली यमुनेच्या तिरीं उतरली तांब्या घागयीर
ठेवली मोत्या चुंबयीळ ठेवली गजनी चोळी
ठेवला पिवळा पिंताबर घातला गळ्याखाली हात
काढला नवलाखी हार ठेवला कलम रुक्षावरी
राधानं आंगूळ बा केली कपाळीं कुंकू लावीयलं
सुर्व्या नमस्कार केली नेसली पिवळा पितांबर
घातली गजनी चोळी घेतली मोत्या चुंबयीळ
घेतली तांब्या घागयीर लागली राजस मारगीं
आली घराजवयीळी वतली घागर घंगायीळी
लावली माळ्याला शिडी काढले चंदन सलपे
पेटविल्या तांब्या चुली काढले साळी तांदूयीळ
घंगाळी आदणीं वैरीयीले मुगाचं वरण करीयलं
केली वाग्यांयाची शाक राधिकां सैपाक बा केला
वाढला सासूसासर्‍याला वाढला दीर जावयीला
वाढला आपुल्या भर्ताराला वाढलं नणंदबाईला
केलं आपुलं बा ताट राधिका जेवाय बसयीली
राधेला अपसकून झाला पैला घास धरनीला
दुसर्‍या घास गळीं आला घातला गळ्याखालीं हात
नाहीं नवलाखी हार राधा मनीं चरकली
गेली यमुनेच्या तिरीं बोलली कलम रुक्षायाला
माजा नवलाखी हार कुठं गेला सांग दादा
कलमावरच गुरुयीड तो बा बोलूं लागयीला
तुजा नवलाखी हार नेला गवळ्याच्या वाड्या
आरं तूं गवळ्या गोइंदा दे बा माजा हार
नवलाखी हार दिल्यावर काय ग राधे देशील
दीन पांच सुपार्‍या दीन पांच नारयीळ
आमी मथुरेचे वानी आमां नारळसुपारीचं काय?...

No comments


animated-button-image-0143


animated-button-image-0143 7,584 दहावी / बारावी पास भर्ती !


animated-button-image-0143

आमचे "शिक्षक डायरी मित्र" हे
Android Application डाउनलोड
करण्यासाठी खाली क्लिक करा



[ Click Here to Download ]



सूत्रसंचालन चारोळ्या !
Powered by Blogger.