17 February 2017

ई ५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.

स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका scholarship Practice Exam Papers.

 ( सदरील प्रश्नपत्रिका प्रशांत शिवाजी हासे सरांच्या ब्लॉग वरून घेण्यात आल्या आहेत !
त्यांचे प्रथम अभिनंदन आणि धन्यवाद !)
ब्लॉग :https://aashramshalasavarchol.blogspot.in

    इ. ५. वी. मराठी  ★ इ.५ वी. स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.७ गणित.  

★ इ.५ वी. स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.५ बुद्धिमत्ता.  
★ इ.५ वी. स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.६ बुद्धिमत्ता. 

★ इ.५ वी. स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.७ बुद्धिमत्ता.  
 इ. ८. वी.गणित.     

  इ. ८. वी.बुद्धिमत्ता.  

 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.१.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.
२.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.३.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.
४.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.५.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.
६.बुद्धिमत्ता. 
 पूर्व माध्यमिक स्कॉलरशीप सराव प्रश्नपत्रिका क्र.७.बुद्धिमत्ता. 

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

ई 4 थी व 7 वी च्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी  ➤ येथे क्लिक करा 

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

15 February 2017

शिवाजी महाराज जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 2017 - संपूर्ण माहिती


PDF डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈


शिवाजी महाराज जन्मोत्सव 19 फेब्रुवारी 2017 - संपूर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून  स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. पवित्र गंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने ल्काहात घेण्या सारखे नाही कां ? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या परतंत्रे विषयीचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नान पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतात द्क्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता.  त्यांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणार्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला.
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संप्विनार्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी ब्ल्काव्ने, स्त्रियांची अब्रू लुटणे, आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे. असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माण या जुलसेमी सत्तेवर रागावली होती.  पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशी अवस्था झाली होती.

स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजींनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाउ न्नि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या अंगभूत गुणांचा विकास केला. आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’  हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले कि काही मराठी माणसे सरदारकी-जहागिरी आणखी मोठ्या हुद्यासाठी परक्या सत्ता धीश्यांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजी राज्याच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.
औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा हता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते शिताफीने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवाजीला लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले.दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्यांन्द्रिच्या कडेकपारीत भटकून सवंगडी ग्ला केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने  स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या स्लाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि  मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक  गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. राक्षसी देहाचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरली. मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी सावध होताच. हातात लपवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेलेच. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते.  सिंहगड घेतांना तानाजी पडला . खिंड लढवितांना  बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपल रक्त दिले. आपले प्राण दिले . स्वराज्य अकराला आले. स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते .

----------------------------------------------------------------
शेअर करा Whatsapp वर

----------------------------------------------------------------

09 February 2017

ई १० वी कल चाचणी संपूर्ण माहितीशासन निर्णय :

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी)दिनांक १५-०२-२०१७ ते ०३०३-२०१७ पर्यंत  घेण्यात येनार आहे

शासन निर्णय


उद्देश :


१) इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे.आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल.

२) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.
     ३. कलचाचणी विडिओ बघा 

  महत्वाच्या Pdf  फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा     कलचाचणी   डाऊनलोड फाईल 
> येथे क्लिक करा < 
१. कलचाचणी CD  Install 
२. कलचाचणी PDF 
३. कलचाचणी विडिओ बघा 
४. Zip File कशी करावी 
५. कलचाचणी वेळापत्रक कसे तयार करावे 
 वेळापत्रक :

⧪ मार्च 2017 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रथम प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्याची‘कल चाचणी’ दि. १५ फेब्रुवारी २०१७ ते  ३ मार्च २०१७ या कालावधीत आयोजित करण्यात येईल.
⧪ कलचाचणी च्या कामा करिता प्रत्येक शाळे मध्ये शालाप्रमुखानी एका शिक्षकास नियुक्त करावे.विद्यार्थाचे गट वार नियोजन करण्याचे काम शाळांनी ‘कलचाचणी’ करिता नियुक्त केलेल्या शिक्षकां मार्फत  करावयाचे आहे.
⧪ ‘कलचाचणी’ करिता ४० मिनिटे कालावधी ठरविला आहे. एका दिवसात एका संगणकावर ६ वेळा ‘कलचाचणी’ घेण्यात यावी. त्या प्रमाणे विद्यार्थाचे गट वार नियोजन करावे.
⧪ ‘कलचाचणी’ मध्ये १४० विधाने आहेत. सर्व विधानांना प्रतिसाद देणे अनिवार्य आहे.

⧪ सर्वसाधारणपणे ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो त्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राधान्याने  आवडतात हे समजून घेणे हा या कलचाचणीचा उद्देश आहे. आपण करीत असलेल्या अनेक कृतींची ही एक यादी आहे. त्यापैकी काही कृती तुम्हाला आवडल्या असतील किंवा नसतील, म्हणून प्रत्येक वाक्य वाचून तुमच्या आवडी निवडीनुसार तुम्हाला योग्य वाटत असलेला पर्याय निवडून उत्तर द्या.

⧪ एखादी कृती तुम्हाला किती आवडते किंवा नाही यावर आधारीत योग्य पर्याय निवडून उत्तर द्या.

⧪ उत्तर देण्यासाठी 'खूप जास्त', 'जास्त ','थोडे ', आणि 'आजिबात  नाही' असे पर्याय आहेत.

⧪ प्रत्येक पानावर ५ विधाने आहेत. पुढील पानावर जाण्याचे बटन क्लिक करण्यापूर्वी विद्यार्थी त्याचा प्रतिसाद बदलू शकतो.

⧪ ‘कल चाचणी’ ची जबाबदारी प्रत्येक शाळेतील एक शिक्षका ची आहे. या शिक्षका ची नियुक्ती शालाप्रमुखानी करावी.

⧪ या शिक्षकाने स्वत: ची , शाळेची व संगणक सुविधांची माहिती http://mh-ssc.ac.in या संकेत स्थळावर सादर करावी.

⧪ ‘कल चाचणी’ बाबतच्या सर्व सूचना या संकेत स्थळावर आपल्या login मध्ये पाहता येतील.

⧪ विद्यार्थी कलचाचणी देण्या करिता संगणक प्रयोगशाळे मध्ये आल्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घ्यावी.

⧪ प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षेच्या गुण पत्रका बरोबर विद्यार्थ्याची उपस्थिती पत्रके विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावीत.

⧪ विद्यार्थाने ‘कलचाचणी’ दिल्या नंतर प्रत्यक संगणकाच्या डेस्कटॉप वर एक फोल्डर तयार होइल व त्या मध्ये SSC बैठक क्रमांक ची फाईल तयार होयील.

⧪ शिक्षकांनी प्रत्येक दिवशी सर्व संगणकावरील फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात. शाळे मधील संगणकावर DEEPFREEZE सारखी संगणक प्रणाली असल्यास संगणक बंद करण्या पूर्वी फाईलस एकत्र कराव्यात व सुरक्षित ठेवाव्यात.

⧪ सर्व विद्यार्थाची ‘कलचाचणी’ पूर्ण झाल्या नंतर या सर्व फाइल्स झिप करून अपलोड करावयाच्या आहेत.

⧪ अपलोड बाबत च्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येतील.

⧪फाईल अपलोड केल्या नंतर आपणास प्रमाणपत्र देण्यात येईल. ते विभागीय मंडळात जमा करावे.

शाळा नोंदणी बाबत FAQ

1) मागी वर्षी नोंदणी केली आहे, पुन्हा नोंदणी करावी लागते का?

➤  हो. यावर्षी पुन्हा फ्रेश नव्याने online शाळा व शिक्षक नोंदणी करायची आहे. बदली, सेवानिवृत्ती अशा कारणासाठी ही माहिती अपडेट लागते.

2) शिक्षक म्हणून कोणाचे नावं नोंदवावे ? कंत्राटी कि कायम ?

 शिक्षक म्हणून कोणाचे नावं नोंदवावे याचे सर्वाधिकार मुख्याध्यापकांना आहेत. कार्य सिद्धीस नेईल अशा शिक्षकाचे नावं नोंदवावे.

3) शाळा नोंदणी बाहेर नेट कॅफेला केली तर चालेलं काय ?

 आपल्या शाळेत रेंजची समस्या असल्यास नोंदणी तुम्ही बाहेर करू शकता. मात्र या सबबीखाली चाचणी बाहेर घेऊ शकत नाही.  कारण चाचणी offline घेता येऊ शकते.

4) मागील वर्षी काम केलेला शिक्षकच नेमायचा का ?
➤  अशी सक्ती नाही. ते मुख्याध्यापक ठरवतील.

 कल चाचणी रजिस्ट्रेशनबाबत 


1] Website -
      http://mh-ssc.ac.in ही website any one Broswer [ EX.google crome ] मध्ये Type करून Entre कराl

2] एक नवीन window open होईल यामध्ये कल चाचणी mh-ssc.ac.inयावर click करा .

3] कल चाचणीचे Page open होईल . या page वरील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचुन घ्या .

4 ] " सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा " असे मराठी मध्ये आहे . यावर click करा .

5 ] आता आपल्या समोर शाळेची माहिती यासंबंधीचे page open झाले असेल . येथे खालीलप्रमाणे माहिती भरा [ माहीती Marathi किंवा English भाषेत भरली तरी चालेल ]

       i. शाळेचा सांकेतांक क्र .
          School Index No.----
           [ उदा .3202055 ]

         पुन्हा तोच शाळेचा सांकेतांक
         खालील चौकटीत Re-entre
         करा .

     ii . शाळेचे नाव :
          School Name:
             ( Type करा )

    iii. शाळेचा दूरध्वनी क्र .
 (with STD Code)

    iv. शाळेचा E-mail  ID

     v.  प्राचार्यांचे नाव -

   Vi. शाळेची वेळ
          School Time

वरील माहिती भरून झाल्यावर click  Here to Next या वर  click करा .


आता
   शिक्षकाची माहिती हे page open होईल .

  [  येथे कल चाचणीची जबाबदारी दिलेल्या शिक्षकाची माहिती भरावयाची आहे ]

1 . शाळेचा सांकेतांक क्रमांक
    School Index No.

2. युडायस कोड

3. शिक्षकाचे नाव

4 . दूरध्वनी क्रमांक

5 .E-mail ID.

6. आपण वॉट्स अॅप वापरता का ?

7 . आपण इ .१० वीस कोणते विषय   शिकवता ?

8. पासवर्ड :

     [ Password नवीन तयार करावयाचा आहे कि ज्यामध्ये English capital , small letters, spcial sign , Numbers यांचा समावेश असेल . हा password विसरु नका]

9. Re - Enter password

वरील सर्व माहिती भरुन झाल्यावर Next Here  वर click करा .


आता

संगणक प्रयोगशाळा माहिती हे Page Open होईल . यामध्ये

1 .१० वी मार्च 2017 च्या परीक्षेत किती विद्यार्था प्रविष्ठ होणार आहेत ती संख्या Type करा

2. आपल्या शाळेत संगणक प्रयोगशाळा आहे का ?

3. किती संगणक आहेत ?

4 . संगणकाचे नेटवर्क [ LAN  ] आहे का ?

5 . इंटरनेटची सुविधा आहे का ?

6. प्रयोगशाळेतील सर्व संगणकावर इंटरनेट वापरु शकता का?

वरील माहिती भरुन झाल्यावर Done process click Here to submit information यावर click करा .


शेवटी
You Have submitted information sucessfully असा message मिळेल .

    अशा प्रकारे आपण कल चाचणीचे रजिस्ट्रेशन  पूर्ण  होईल .


आता

 Teacher login वर Click करा .

  Login    window  open होईल . यामध्ये

School Index No

Password

 Type करून  login वर click करा .

एक नवीन window open होईल .

ज्या मध्ये जबाबदारी दिलेल्या शिक्षकाचे नाव असेल आणखीन इतर माहिती ही असेल .


 कल चाचणी ची झिप ZIP फाईल कशी बनवाल  
                                               ( How to create Zip file kalchachni )


प्रथम Desktop वर सेव कलेले फोल्डर ओपन करा
जेवढ्या.फाईल्स सेव झालेल्या आहेत त्या सर्वांना सल्लेक्त करा
राईट क्लिक करा
Send to वर क्लिक करा
Compressed Zip folder वर क्लिक करा
आणि ओके करा
Desktop वर एक नवीन फोल्डर तयार झालेले असेल
त्याला रिनेम करा
आपल्या शाळेचा सांकेतांकाने
Ex : S3200256

लक्ष्यात ठेवा नाव देऊनच फाईल्स उपलोड करावी .


हार्दिक शुभेच्या .